तळोदा नेमसुशिल विद्यामंदिरात मुलींना आकार शिष्यवृत्तीचे वितरण
ईगल लाईव्ह हूड फाउंडेशन यांच्या पुढाकाराने नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यामध्ये आशाए या प्रकल्पाच्या अंतर्गत मुलींना आकार स्कॉलरशिप देण्यात आली. या स्कॉलरशिपच्या अंतर्गत तालुक्यातील हजार मुलींना याचा प्रत्यक्ष लाभ झालेला आहे. सदर स्कॉलरशिपच्या अंतर्गत आठवी, नववी, दहावी मधील मुलींचा समावेश करण्यात आलेला आहे. काही निकषानुसार मुलींना स्कॉलरशिप प्रदान करण्यात आलेली आहे. आकार स्कॉलरशिपची अंमलबजावणी मा.मुख्य कार्यकारी अधिकारी नंदुरबार श्री.सावन कुमार तसेच शिक्षण विभागाच्या माध्यमातून करण्यात आली. नेमसुशिल विद्यामंदिर, तळोदा येथील इयत्ता आठवी व नववी मधील एकूण 18 विद्यार्थिनींना प्रत्येकी हजार रुपये शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. या स्कॉलरशिपचा उद्देश मुलींना मार्गदर्शन, प्रोत्साहन तसेच वित्तीय सहायता करून त्यांना उच्च शिक्षणासाठी प्रेरित करणे आहे. आकार मुलींच्या स्कॉलरशिपमुळे नक्कीच मुलींना शैक्षणिक प्रवासामध्ये फायदा होईल आणि शैक्षणिक जीवनात त्यांना सहकार्य मिळेल.
आकार मुलींचे स्कॉलरशिप वितरणावेळी शिक्षण विभागातील तळोदा तालुका गटशिक्षण अधिकारी मा.श्री शेखर धनगर साहेब शाळेचे प्राचार्य सुनिल परदेशी, मुख्याध्यापिका भावना डोंगरे, रेखा मोरे, इच्छाराम बैसाणे, रवींद्र गुरव, सचिन पंचभाई आदी शिक्षक बंधू-भगिनी उपस्थित होते. तळोदा तालुक्यातील मुलींना आकार स्कॉलरशिप मिळवून दिल्याबद्दल ईगल लाईव्ह हूड फाउंडेशन यांचे खूप खूप आभार.
संस्थाध्यक्ष निखिल भाई तुरखिया,उपाध्यक्ष महाले आप्पा, सचिव संजय भाई पटेल, संचालिका सोनाबेन तुरखिया व संस्था समन्वयक हर्षिल तुरखिया यांनी कौतुकास्पद अभिनंदन केले.

Post a Comment
0 Comments