Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

मानव-बिबट वन्यजीव संघर्ष जनजागृती" विषयक दोन दिवसीय कार्यशाळा

मानव-बिबट वन्यजीव संघर्ष जनजागृती" विषयक दोन दिवसीय कार्यशाळा 


आदिवासी सांस्कृतिक भवन, तळोदा येथे मेवासी वनविभाग, तळोदा यांच्या वतीने "मानव-बिबट वन्यजीव संघर्ष जनजागृती" विषयक दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून मा. आमदार श्री. राजेश दादा पाडवी साहेब उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. उपवनसंरक्षक श्री लक्ष्मण पाटील (मेवासी वनविभाग, तळोदा) यांनी अध्यक्षस्थान भूषविले. 

प्रारंभी वनपरिक्षेत्र अधिकारी तळोदा श्री. शंतनु सोनवणे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले व कार्यशाळेच्या उद्दिष्टांची सविस्तर माहिती उपस्थितांसमोर मांडली.

यानंतर मा. सहाय्यक वनसंरक्षक श्री. संजय पवार यांनी कार्यशाळेच्या आयोजनामागील उद्देश, मानव-बिबट संघर्ष निवारणासाठी वनविभागाने सुरू केलेले विविध प्रयत्न तसेच या कार्यामध्ये लोकसहभागाचे महत्त्व विशद केले.



या प्रसंगी मा. आमदार महोदयांनी "जन व वन" या संकल्पनेवर सखोल आणि अभ्यासपूर्ण  मार्गदर्शन केले. त्यांनी वने व लोक यांच्यातील सहअस्तित्वाची आवश्यकता विशद करताना सातपुडा जंगल क्षेत्रातील CFR (Community Forest Resource) क्षेत्रामध्ये स्थानिक ग्रामस्थांच्या सहभागातून व्यापक वृक्षारोपण मोहिम राबविण्याबाबत मा. जिल्हाधिकारी महोदय व मा. पालकमंत्री यांच्याशी सल्लामसलत करून पुढील कार्यवाही करण्याचे सुचविले.


या कार्यशाळेमध्ये प्रशिक्षणासाठी मा. डॉ. स्वप्नील सोनोने (अमरावती) व श्री. पंकज बांडाबुचे (पुणे) यांनी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी मानव-बिबट संघर्ष व्यवस्थापन, प्रतिबंधात्मक उपाययोजना व स्थानिक स्तरावरील सहभाग याबाबत सखोल व उपयुक्त माहिती दिली.


कार्यशाळेमध्ये बिबट संवेदनशील क्षेत्रांतील सरपंच, पोलीस पाटील, QRT (Quick Response Team) सदस्य, तसेच वनविभागातील अधिकारी श्री. निखिल एखंडे (वनक्षेत्रपाल, काठी), श्रीमती अंबिका पाटील (वनक्षेत्रपाल, मोलगी), श्री. सलीम शेख (वनक्षेत्रपाल, वडफळी) सागर निकुंभे ( मानद वन्यजीव रक्षक, नंदुरबार) , वनपाल, वनरक्षक व इतर वन कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यानंतर श्री. शंतनु सोनवणे, वनपरिक्षेत्र अधिकारी, तळोदा यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

0 Comments