प्रकाशा येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नंदुरबार धुळे जिल्हा कमिटीची बैठक संपन्न
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नंदुरबार धुळे जिल्हा कमिटीची बैठक कॉ. सुदाम ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली प्रकाशा येथे पार पडली. बैठकीत महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीस जिल्हा सचिव कॉ. शामसिंग पाडवी , पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉ.नत्थु भाऊ साळवे, पक्षाचे जिल्हा सचिव मंडळ सदस्य कॉ.अनिल ठाकरे, कॉ.सुनील गायकवाड, कॉ. रुबाबसिंग ठाकरे , कॉ.विक्रम वळवी यासह कॉ. सुदाम ठाकरे , कॉ. बाज्या वळवी , कॉ.नारसिंग वसावे , कॉ.खंडू सामुद्रे , कॉ. सनु न्हावें , कॉ. सुबडीबाई पाडवी , आदी जिल्हा कमिटी सदस्य तथा शेतमजूर युनियनचे जिल्हा सचिव कॉ.सुभाष ठाकरे उपस्थित होते. बैठकीत महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी लोकशाही मार्गाने टीका आत्मटीकात्मक चर्चा झाली .प्रत्येक विषयावर जिल्हा कमिटी सदस्यांनी आपापले स्वतंत्र मत मांडले .आजच्या बैठकीत संविधान विरोधी व अभिव्यक्ती स्वातंत्र्यविरोधी असणाऱ्या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात राज्यभरात 1000000 सह्यांची मोहीम यशस्वी करण्याचा निर्णय एकमताने संमत करण्यात आला. त्यानुसार येत्या 30 एप्रिल रोजी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयावर जनतेचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नष्ट करू पाहणाऱ्या या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात जनआक्रोश मोर्चा काढण्याचा व विधेयका विरोधातील जिल्ह्यातील जनतेची सह्यांची यादी मा .जिल्हाधिकारी मॅडमांना निवेदनाच्या माध्यमातून देण्याचा निर्णय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नंदुरबार धुळे जिल्हा कमिटीने घेतला .सदर मोर्चास जिल्ह्यातील सर्व डाव्या , पुरोगामी व धर्मनिरपेक्ष पक्षांनी तसेच लोकशाही ,संविधान व अभिव्यक्ती स्वातंत्र्याला मानणाऱ्या सर्वच सामाजिक जनसंघटनांनी सहभागी होण्याचे आवाहन माकपाच्या जिल्हा कमिटीच्या वतीने करण्याचा निर्णय देखील यावेळी घेण्यात आला. पक्ष लेव्ही व नूतनीकरण 20 एप्रिल पर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना देखील यावेळी प्रत्येक तालुका कमिटीला देण्यात आल्या आहेत.



Post a Comment
0 Comments