Type Here to Get Search Results !

स्थानिक तक्रार समितीसाठी पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावे विनोद वळवी

 स्थानिक तक्रार समितीसाठी पात्र उमेदवारांनी अर्ज सादर करावे

विनोद वळवी

                    नंदुरबार, दिनांक 15 एप्रिल, 2025 (जिमाका) :

कामाच्या ठिकाणी महिलांना काम करण्यास पोषक आणि लैंगिक छळापासून मुक्त वातावरण मिळावे, या उद्देशाने नंदुरबार जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयाने “स्थानिक तक्रार समिती” स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनोद वळवी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.


कायद्यानुसार कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई व निवारण) अधिनियम 2013 नुसार, जिल्हा स्तरावर “स्थानिक तक्रार समिती” स्थापन करणे आवश्यक आहे. या समितीमध्ये अध्यक्ष आणि सदस्य असतील.


अध्यक्ष पदासाठी: सामाजिक कार्याचा 5 वर्षांचा अनुभव असावा.  आणि आणि महिलांच्या न्याय हक्कांसाठी प्रतिबंध असलेली महिला या पदासाठी अर्ज करू शकते.


सदस्य पदासाठी : दोन सदस्यांपैकी महिलांच्या न्याय, हक्कासाठी प्रतिबद्ध असलेली अशासकीय संघटना/संघ किंवा लैंगिक छळाच्या विषयाशी परिचित असलेल्या असाव्यात.  किमान एक सदस्याची पार्श्वभुमी प्राधान्याने कायद्याची असावी. कायद्याची पदवी घेतेली असावी व महिला व बालकांच्या क्षेत्रात कार्य केलेले असावे. तसेच, किमान एक नामनिर्देशित  सदस्य अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास वर्ग किंवा अल्पसंख्याक समाजातील असावी.


समितीचा कार्यकाळ 3 वर्षांचा असेल. कोणत्याही फौजदारी गुन्ह्यात दोषी ठरलेली व्यक्ती अर्ज करण्यास अपात्र असेल. इच्छुक उमेदवारांनी 21 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कक्ष क्र. 226, टोकरतलाव रोड, नंदुरबार – 425412 येथे 

जमा करावेत, असेही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री वळवी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.


Post a Comment

0 Comments