Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

कोयलिविहीर येथील वीज उपकेंद्राचे भूमिपूजन आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते संपन्न

 


अक्कलकुवा तालुक्यातील कोयलीविहिर येथे महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे 33/11 के. व्ही. उप केंद्राचे भुमीपुजन मोठया उत्साहात संपन्न झाले.



       अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी यांच्या हस्ते उप केंद्राचे भुमीपुजन करण्यात आले. 


             यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन अक्कलकुवा तालुका शेतकी सहकारी संघाचे चेअरमन पृथ्वीसिंग पाडवी, शिवसेनेचे नंदुरबार लोकसभा प्रमुख ललित जाट, शिवसेनेचे तालुकाप्रमुख तुकाराम वळवी, तालुका संघटक आनंद वसावे,  माजी सरपंच राजेंद्र वसावे, विनोद वळवी, प्रा. दिनेश खरात,  जि.प. माजी सदस्य कपिल चौधरी, तापसिंग वसावे, सरपंच केतन पाडवी, टेडग्या वसावे, नवरतन टाक, नटवर पाडवी, हरिश्चंद्र पाडवी, सोशल मीडियाचे जिल्हाप्रमुख हुजेफा बलोच, स्विय सहाय्यक रविंद्र गुरव, सुधीरकुमार ब्राम्हणे, भाऊ पाडवी, महाराष्ट्र राज्य विज वितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता डी. के. पाडवी आदीं उपस्थित होते. आमदार आमश्या पाडवी यांच्या प्रयत्नामुळे  कोयलीविहिर येथे 33/11 के.व्ही. क्षमतेचे उप केंद्र मंजुर झाले आहे. या केंद्रामुळे परिसरातील शेतकरी व घरगुती ग्राहक यांना पुरेशी व नियमित विज मिळण्यास मदत होणार आहे. तसेच आमदार आमश्या पाडवी यांच्या प्रयत्नाने उप केंद्रासाठी जागा उपलब्ध झाली आहे.

Post a Comment

0 Comments