प्रतापपुर केंद्राची शिक्षण परिषद संपन्न
तळोदा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोपाळपूर पु.क्रं.६ येथे गोपाळपूर, राणीपूर,मोकसमाळ,चिनीपाणी या शाळांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले.शिक्षण परिषदेचे अध्यक्षस्थानी प्रतापपूर केंद्राचे केंद्रप्रमुख श्रीमती रंजना निकुंभे तर प्रमुख पाहुणे म्हणून तळोद्याचे गटशिक्षणाधिकारी शेखर धनगर,केंद्र प्रमुख जगन्नाथ मराठे,प.स.सदस्य सांगदेव वळवी,विजय वसावे,बादलसिंग वसावे,कौशल्याताई वसावे,मधुकर ठाकरे,केंद्र मुख्याध्यापक जगदिश भागवत,ग्रामविस्तार अधिकारी एस.सी.लांडगे,ग्रामसेवक आप्पा माळी,शिक्षण परिषदेचे निरीक्षक अरुण जयस्वाल,मिलींद देसले उपस्थित होते .
आदिवासींची दैवत'याहा मोगी' व स्त्री शिक्षणाचे दैवत 'सावित्रीबाई फुले' यांच्या प्रतिमांचे पुष्पहार व पूजन करुन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.बादलसिंग वसावे यांचा सेवापूर्ती सत्कार करण्यात आला.
गटशिक्षणाधिकारी यांनी शैक्षणिक क्षेत्रातील कामाचा व्याप,ऑनलाईनची कामे,कामाच्या ताण तणावातून मुक्तता कशी मिळवावी,कामाचे नियोजन कसे करावे,वर्तमानात शिक्षकाने अपडेट कसे राहावे,गुणवत्ता विकासासाठी शिक्षकांनी काय उपाय योजना कराव्यात.याबाबत मार्गदर्शन केले.निपुण महाराष्ट्र अभियान कृती कार्यक्रम कोणत्या प्रकारे शालेय स्तरावर अमंलबजावणी करावी . याबाबत नंदकुमार शेंदरे यांनी माहिती दिली.शिक्षक अनुभव कथन बिर्हाडे सरांनी केले.इंग्रजी ग्रॅन्ड बुक बद्दल सविस्तर माहिती विजय कोळी यांनी दिली.माझा वर्ग माझे नियोजन गटकार्य कसे वर्गपातळीवर करुन घ्यावे.प्रत्यक्ष गट पाडून गटकार्य करुन घेतांना कोणती काळजी घ्यावी.याबाबत माहिती संगिता वसावे,मनिषा ठाकूर यांनी दिली. सादरीकरणमागील शिक्षण, परिषदेचा आढावा,गुणक्ता विषयक माहिती,निपुण भारत अभियान, प्रशासकीय माहिती,ऐनवेळचे विषय,लिंक भरणे,अध्यापनातील समस्या व प्रश्नांचे निरसन कसे करावे.याबाबत मार्ग दर्शन रंजना निकुंभे यांनी केले .
या शिक्षण परिषदेचे सुत्रसंचालन भिमसिंग वळवी तर उपस्थितांचे आभार अमरसिंग ठाकरे यांनी मानले.शिक्षण परिषदेच्या यशस्वीतेसाठी मुख्याध्यापक स्वाती पोतदार शिक्षकवृंद भिमसिंग वळवी, बिर्हाडे सर,शीतल शेवाळे,शिवाजी ठाकरे,पदम माळीस,विजय कोळी, प्रविण वसावे,ग्रामस्थ यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment
0 Comments