Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत बैठक व प्रशिक्षण कार्यक्रम

 रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत बैठक व प्रशिक्षण कार्यक्रम

जिल्हा रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत बैठक व प्रशिक्षण सत्र आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती अंजली शर्मा यांनी भूषवले.


या बैठकीस जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी, जिल्हा इंटिग्रेटेड रोड ॲक्सिडेंट डेटाबेस (Integrated Road Accident Database - iRAD) समन्वयक, तसेच नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया (National Highways Authority of India - NHAI), नॅशनल हायवे पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट (National Highways - Public Works Department - NH-PWD), प्रधानमंत्री ग्राम सडक योजना (Pradhan Mantri Gram Sadak Yojana - PMGSY), बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद नंदुरबार येथील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.


या बैठकीत भारत सरकारच्या रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या ‘इंटिग्रेटेड रोड ॲक्सिडेंट डेटाबेस (iRAD)’ या प्रकल्पाची माहिती देण्यात आली. रस्ते अपघातांबाबत अचूक माहिती गोळा करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी iRAD मोबाईल व वेब अ‍ॅप्लिकेशन विकसित करण्यात आले आहे.


प्रशिक्षणादरम्यान सहाय्यक जिल्हाधिकारी श्रीमती अंजली शर्मा यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, या अ‍ॅप्लिकेशनचा प्रभावी वापर करून जिल्ह्यातील रस्ते अपघातांमध्ये घट कशी आणता येईल, यावर विशेष लक्ष द्यावे. संबंधित विभागांनी हे अ‍ॅप्लिकेशन नियमितपणे वापरावे, असे निर्देश त्यांनी दिले.

Post a Comment

0 Comments