भाजपाच्या अक्कलकुवा तालुकाध्यक्षपदी भूषण कीर्तीकुमार पाडवी यांची निवड
अक्कलकुवा :-
भारतीय जनता पक्षाच्या अक्कलकुवा तालुकाध्यक्षपदी भूषण कीर्तीकुमार पाडवी यांची नुकत्याच पार पडलेल्या एका बैठकीत निवड करण्यात आली.
भारतीय जनता पक्षाचे कार्याध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण माजी मंत्री आमदार डॉ. विजयकुमार गावित माजी खासदार डॉ. हिना गावित प्रदेश महामंत्री विजय चौधरी जिल्हाध्यक्ष निलेश माळी यांच्या मार्गदर्शनाने अक्कलकुवा येथे तालुकाध्यक्ष निवडीसाठी बैठक संपन्न झाली माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी मावळते तालुकाध्यक्ष नितेश वळवी माजी पंचायत समिती सदस्य धनसिंग वसावे, अशोक राऊत सरपंच जयमलसिंग पाडवी, भूपेंद्र पाडवी, किसन नाईक, नरेश पाडवी, रोशन पाडवी माजी शहराध्यक्ष नरेश जैन आदींच्या उपस्थितीत सर्वानुमते भूषण पाडवी यांची अक्कलकुवा मंडळ अध्यक्षपदी निवड करण्यात आली. निवडणूक निरीक्षक म्हणून जिल्हा उपाध्यक्ष विनोद कामे यांनी काम पाहिले. जनसंघापासून भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठपणे जुळलेले व जिल्ह्यात पक्ष संघटन वाढविण्यासाठी प्रयत्नशील असलेले दिवंगत नेते माजी मंत्री कै. दिलवरसिंग पाडवी यांचे नूतन तालुकाध्यक्ष भूषण पाडवी हे नातू असून माजी जिल्हाध्यक्ष नागेश पाडवी यांचे पुतणे आहेत.

Post a Comment
0 Comments