रोझवा पुनर्वसन येथे मा. मुख्यमंत्री शंभर दिवस कृतीकार्यक्रमांतर्गत शिबिरात विविध दाखले वाटप
तळोदा तालुक्यातील तालुक्यातील रोझवा पुनर्वसन येथे जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत महसूल विभागअंतर्गत मंडळ स्तरावर छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर अभियान तसेच मा. मुख्यमंत्री शंभर दिवस कृती कार्यक्रमांतर्गत शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिरात विविध दाखले उत्पन्नाचे दाखले, जिवंत सातबारा योजना,रेशनकार्ड,संजय गांधी, इंदिरा गांधी योजना, हयातीचे प्रमाणपत्रसह विविध दाखल्यांचे वाटप करण्यात आले.त्यामुळे परिसर तालुक्यातून समाधान व्यक्त करण्यात आले.
यावेळी तहसीलदार दीपक देवरे, गटविकास अधिकारी काशिनाथ पवार,प. स. कर्मचारी,सरपंच सरदार पावरा, ग्रामसेवक नासिर शेख, उपसरपंच वंतीबाई तडवी, ग्रा प सदस्य भरतसिंग पावरा, विजय पावरा, वर्षां पावरा, दिलमा वसावे, बालगीर वसावे, एमना पावरा तसेच ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment
0 Comments