Type Here to Get Search Results !

SidDhi Printers

SidDhi Printers

महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात "विशाखा समिती,"सखी साविञी समिती,विदयार्थी सुरक्षा समितीवर मार्गदर्शन कार्यक्रम

महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात "विशाखा समिती,"सखी साविञी समिती,विदयार्थी सुरक्षा समितीवर मार्गदर्शन कार्यक्रम                                                     


      पिंपळनेर: - विशाखा समिती म्हणजे कामाच्या ठिकाणी महिलांवर होणाऱ्या  छळाच्या घटना रोखण्यासाठी आणि त्यावर उपाययोजना करण्यासाठी स्थापन केलेली समिती आहे. या समितीचे मुख्य उद्दिष्ट महिलांना सुरक्षित आणि त्रास-मुक्त कामाचे वातावरण उपलब्ध करून देणे आहे.त्यामुळेच विशाखा समितीचे महत्त्व शाळा व महाविद्यालयांमध्ये विशेष असे असल्याने त्या समितीची माहिती करुन घेणे महत्वाचे आहे असे आवाहन  प्राचार्य डॉ.सतीश पाटील यांनी केलो,याप्रंसगी समिती प्रमुख प्रा.श्रीमती टि.जे.साळवे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.                                                                    श्रीमती मनकर्णाबाई विनायकराव मराठे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालयात "विशाखा समिती,"सखी साविञी समिती,विदयार्थी सुरक्षा समिती,तक्रार पेटी कार्यवाही यावर मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला.आपल्या मार्गदर्शनपर भाषणात प्राचार्य डॉ.सतीश पाटील म्हणाले की,महिलांसाठी सुरक्षिततेबाबत 

विशाखा समिती कामाच्या ठिकाणी महिलांना लैंगिक छळापासून सुरक्षित ठेवते,तसेच तक्रार निवारणाबाबत ही समिती छळाच्या तक्रारींचे निवारण करते आणि पीडितांना योग्य मदत पुरवते. 

विशाखा समिती छळाच्या विरोधात जनजागृती करते आणि लोकांना या समस्येबद्दल माहिती देते. यासाठी कायद्याचे पालन करणे आवश्यक आहे.ही समिती कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाच्या विरोधातील कायदे आणि नियमांचे पालन करते. 

व सशक्तीकरणासाठी महाविद्यालयातील विशाखा समिती महिलांना त्यांच्या हक्कांबद्दल जागरूक करते आणि त्यांना सक्षम बनवते. 

            प्रा.श्रीमती टी.जे.साळवे आपल्या भाषणात म्हणाल्या की,

विशाखा समिती कामाच्या ठिकाणी सकारात्मक बदल घडवूनआणण्यास मदत करते.व विशाखा समिती लैंगिक छळ प्रकरणांमध्ये पीडितांना न्याय मिळवून देण्यास मदत करते. 

श्रीमती विशाखा आणि इतर विरुद्ध राजस्थान राज्य या खटल्यामुळे

कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ प्रतिबंध आणि निवारण कायदा,२०१३ला जन्म मिळाला, ज्यामध्ये प्रत्येक नियोक्त्याला कामाच्या ठिकाणी लैंगिक छळाशी संबंधित तक्रारींचे निराकरण करण्यासाठी एक यंत्रणा प्रदान करणे बंधनकारक आहे. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या तत्त्वानुसार महाविद्यालय कॅम्पसमध्ये छळ आणि तोंडी/शारीरिक शोषणाविरूद्ध हमी देण्यासाठी विशाखा समितीची स्थापना केली जाते.विशाखा समितीच्या कामकाजाबाबत प्रत्येक घटकाला परिसर अभिमुख करण्यासाठी समिती जबाबदार आहे.या कार्यशाळेत विद्यार्थी शिक्षिकांनी सहभाग घेतला त्यात सखी साविञी समितीची माहिती दामिनी सोनवणे,तर योगिता ठाकरे यांनी महिला सुरक्षा अॅपची माहिती दिली.प्रास्ताविक गायञी दशपुते,सूञसंचलन चेतना सावंत तर आभार प्रदर्शन निकिता भवरे यांनी केले.

Post a Comment

0 Comments