तळोदा शिवसेनेतर्फे विविध योजनांचे लाभार्थींच्या मोफत अर्ज भरले.
तळोदा शहर शिवसेना तर्फे संजय गांधी वृद्धपकाळा श्रावणबाळ कुटुंब अर्थसहाय्य बालसंगोपन योजनेचे तसेच वरील योजनेचे हयातीचे 762 फॉर्म हे मोफत भरून देण्यात आले.
कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राम रघुवंशी, उपजिल्हा प्रमुख गौतम जैन, तालुका प्रमुख अनुप उदासी, नंदुरबारचे माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे, नंदुरबार लोकसभा उपाध्यक्ष संदिप परदेशी, नगरसेविका सौ प्रतीक्षा दुबे, कोमल सोनार , माजी नगरसेवक हितेंद्र क्षत्रीय, विजय मराठे, सुरज माळी, कल्पेश चव्हाण, नितेश सोनार, विक्की मनसुरी मनोज दुबे, पवन भोई, विनोद वंजारी हे उपस्थित होते.
प्रस्तावना आनंद सोनार यांनी केले. सदर कार्यक्रमाला मार्गदर्शन करताना राम रघुवंशी यांनी शिवसेने सदैव 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण केले आहे. गोरगरीब जनतेला सरळ मदतीचा हात ही शिवसेनेचा प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ते हे करत राहतात रात्र पहाट न बघता धावून हा फक्त शिवसैनिक च जातो. नंदुरबार जिल्ह्यात शिव सेनेचे अगोदर एक आमदार होते. आता दोन आमदार झाले आहे.
त्यामुळे शिवसेनेची शक्ती हि मोठ्या प्रमाणात वाढत असून येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील मोठ्या प्रमाणात लोकप्रतिनिधी हे निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी मदत व प्रयत्न आम्ही सर्व मिळून करूच परंतु त्यासाठी आम्हाला आपल्या आशीर्वादाची गरज पडेलच व मला तळोदा शहर शिवसेना करत असलेल्या कार्यावर व समोर बसलेल्या लोकांची उपस्थिती आपण नक्कीच आमच्या सर्व उमेदवाराणा नक्कीच मत रुपी आशीर्वाद देऊन आपली सेवा करण्याची संधी द्याल हा विश्वास व्यक्त करतो.
वरील सर्व योजनेची माहिती अनुप उदासी यांनी दिला. सूत्रसंचालन आविनाश मराठे यांनी केले. आभार प्रदर्शन सुरज माळी यांनी केले. सदर कार्यक्रमास मोठ्या प्रमाणत लोकांनी गर्दी केली होती.



Post a Comment
0 Comments