21 एप्रिलला महिला लोकशाही दिन
विनोद वळवी
नंदुरबार, दिनांक 17 एप्रिल, 2025 (जिमाका) :
महिलांच्या तक्रारी, अडचणींची सोडवणूक शासकीय यंत्रणेकडून करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी दरमहा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येत असून एप्रिल महिन्यात 21 एप्रिल, 2025 रोजी सकाळी 11 वाजता रंगावली सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार येथे जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे, असे सदस्य सचिव महिला लोकशाही दिन तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी विनोद वळवी यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
महिला लोकशाही दिनात तक्रार अथवा निवेदन वैयक्तिक स्वरुपाचे असावे, न्यायप्रविष्ठ प्रकरणे, आस्थापना विषयक, व सामुहिक तक्रार या विषयावरील अर्ज महिला लोकशाही दिनी स्विकारले जाणार नाहीत, असेही श्री. वळवी यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे

Post a Comment
0 Comments