Type Here to Get Search Results !

सुमारे 20 कोटी पेक्षा जास्त निधी मंजूर आमदार आमश्या पाडवी यांच्या प्रयत्नांना यश

अक्कलकुवा धडगाव विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामांसाठी सुमारे 20 कोटी पेक्षा जास्त निधी मंजूर 


           आमदार आमश्या पाडवी यांच्या प्रयत्नांना यश

पालकमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या पत्रकार परिषदे मार्फत आमदार पाडवी मानले आभार


                                  नंदुरबार जिल्हा नियोजन समिती मार्फत पालकमंत्री ना. माणिकराव कोकाटे यांनी अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामांसाठी सुमारे 20 कोटी पेक्षा जास्त निधी मंजूर करण्यात आला आहे. सदर अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमश्या पाडवी यांनी वेळोवेळी आपल्या मतदार संघात विकासासाठी मागणी केली होती.


आमदार पाडवी यांनी आपल्या मतदारसंघात शिक्षण, आरोग्य, रस्ते, वीज, पाणी, रोजगार अशा मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करीत आहे. त्याचेच फलस्वरूप जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमाने आपल्या मतदारसंघात विविध विकास कामांसाठी 20 कोटि पेक्षा अधिक निधी मंजूर करण्यात आणण्यात मोठे यश आले आहे. यामुळे अक्कलकुवा अक्राणी विधानसभा मतदारसंघात विकास कामांना चालना मिळाली आहे.

त्यांनी अक्कलकुवा येथील आमदार कारल्यात दिनांक 2 अप्रैल 2015 रोजी 12 वाजता पत्रकार परिषद आयोजित केली होती त्यात त्यांनी सांगितले की मागच्या पालकमंत्र्यांनी अक्कलकुवा अक्राणी मतदार संघात विकासासाठी एवढा निधि आजपर्यंत दिला नाही. सदर जिल्ह्याचे नवीन पालक पालकमंत्री नामदार माणिकराव कोकाटे यांनी अक्कलकुवा अक्राणी मतदार संघाच्या विकासासाठी 20 कोटि पेक्षा जास्त निधि मंजूर केला त्यांचा आभार पत्रकार परिषदेच्या माध्यमातून यावेळी आमदार आमश्या पाडवी यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments