मुख्यमंत्री 100 दिवस कृती आराखडा - सप्तसूत्री कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय तपासणी
🗓️ दिनांक 28/04/2025 रोजी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी "100 दिवस कृती आराखडा" अंतर्गत सप्तसूत्री कार्यक्रमानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील अभिलेख शाखा व अभिलेख कक्ष तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय, नंदुरबार येथे भेट देऊन सेवा-सुविधांचा आढावा घेतला.
✅ विभागांतील सेवा प्रक्रिया व सेवा वितरण कार्यपद्धतीची तपासणी
✅ अधिकारी व कर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून अडचणी व सुधारणा यावर चर्चा
✅ नागरिकांना सेवा पुरवठ्यात गती 🚀 व पारदर्शकता 🔎 वाढवण्यावर विशेष भर
✅ सेवा प्रक्रियेत तातडीने सुधारणा करण्याचे दिले स्पष्ट निर्देश
या तपासणी वेळी अंजली शर्मा (सहायक जिल्हाधिकारी नंदुरबार), श्री. हरिष भामरे (निवासी उपजिल्हाधिकारी), श्री. सतिष निकम (नायब तहसिलदार, अभिलेख शाखा), बांधकाम विभागाचे श्री. इंगळे (उपकार्यकारी अभियंता), श्री. कुणाल सुर्यवंशी (कनिष्ठ अभियंता) व इतर अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
📌 नागरिकाभिमुख प्रशासनासाठी कटिबद्ध!
#100दिवसकृतीआराखडा #सप्तसूत्रीकार्यक्रम #नंदुरबार #लोकाभिमुखप्रशासन #परिपूर्णसेवा



Post a Comment
0 Comments