तळोदा तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर
तळोदा (प्रतिनिधी) :-
अनुसूचित क्षेत्राबाहेरील ग्रामपंचायतीं व पुर्णत: अनुसूचित क्षेत्रात समाविष्ट असलेल्या ग्रामपंचायती यामधील सन २०२५ ते २०३० मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणूका व या कालावधीत गठीत होणाऱ्या तळोदा तालुक्यातील ग्रामपंचायतींचे सरपंच पदाचे आरक्षण जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी जाहिर केले आहे.
तालुक्यातील अनुसूचित जमाती राखीव तेहतीस ग्राम पंचायत यांत राणीपूर, करडे, छोटाधनपूर, पिंपरपाडा, खुषगव्हाण, बुधावली , अमोणी, राजविहीर,अम्मलपाडा, दसवड,आमलाड, दलेलपूर, प्रतापपूर, बोरद, चिनोदा, सोमावल खु., वाल्हेरी, धानोरे, सोमावल बु., नवागांव, कढेल, मोड, रोझवे, चौगाव खुर्द, रापापूर, खर्डी बु. , धवळीविहिर , बेलीपाडा, सिलींगपूर , खर्डी खु., जिवननगर, इच्छागव्हाण, मालदा समाविष्ट आहेत.
अनुसूचित जमाती स्री राखीव चौतीस ग्राम पंचायत यांत चौगाव बु., लाखापूर रे, नळगव्हाण, भवर, लोभाणी, धनपूर, खेडले, शिरवे, मोदलपाडा, खरवड, न्यूबन, तळवे, झिरी, त-हावद, सलसाडी, रांझणी, काझीपूर,मोरवड, मोहिदा, सरदारनगर, नर्मदानगर, रेवानगर , रोझवा पुर्नवसन, अलवान, कोठार, पाडळपूर, रतनपाडा, सावरपाडा, रामपूर, बंधारे, गंगानगर, लाखापुर फॉ., राणापुर, तुळाजे सिंगसपुर एकुण सदूसष्ट ग्रामपंचायती सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले आहे.
Post a Comment
0 Comments