भूमी अभिलेख कार्यालयामार्फत
नंदुरबार, (जिमाका) :
नंदुरबार तालुक्यातील नागरिकांच्या जमिनीच्या मोजणी आणि नगर भूमापन (सिटी सर्व्हे) संबंधित प्रलंबित कामांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी, उप अधीक्षक भूमी अभिलेख (नंदुरबार) कार्यालयाने 27 मार्च 2025 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, नंदुरबार येथे तक्रार निवारण शिबिराचे आयोजन केले असल्याचे, भूमी अभिलेख उप अधिक्षक किरणकुमार पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
ज्या नागरिकांची कामे प्रलंबित आहेत किंवा ज्यांना आपल्या शेतजमिनी किंवा नगर भूमापन (सिटी सर्व्हे) अंतर्गत मिळकतींबाबत काही माहिती हवी आहे, त्यांनी आवश्यक कागदपत्रांसह या शिबिरात उपस्थित रहावे असे आवाहनही श्री. पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
Post a Comment
0 Comments